Skip to main content
पडताळणी प्रलंबित

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी

कर कटेवरी ठेवूनिया || धृ ||

तुळशी हार गळा कासे पितांबर

आवडे निरंतर हेचि ध्यान || १ ||

मकर कुंडले तळपती श्रवणी

कंठी कौस्तुभमणी विराजित || २ ||

तुका म्हणे माझे हेची सर्व सुख

पाहीन श्री मुख आवडीने || ३ ||

सुंदर ते ध्यान उभे विटेवर