Skip to main content
पडताळणी प्रलंबित

सुखाचे हे नाम आवडीने गावे

सुखाचे हे नाम आवडीने गावे

वाचे आळवावे विठोबासी || धृ ||

संसार सुखाचा होईल निर्धार

नामाचा गजर सर्व काळ || १ ||

कामक्रोधाचे चलेची काही

आशा मनशा पाही दूर होती || २ ||

आवडी धरोनी वाचे म्हणे हरीहरी

म्हणतसे महारी चोखियाची || ३ ||

सुखाचे हे नाम आवडीने गावे sukha