Skip to main content
पडताळणी प्रलंबित

धरीला पंढरीचा चोर | गळा बांधुनिया दोर….

धरीला पंढरीचा चोर | गळा बांधुनिया दोर || १ ||

हृदय बंदिखाना केला | आंत विठ्ठल कोंडीला || २ ||

शब्दे केली जडाजुडी | विठ्ठल पायी घातली बेडी || ३ ||

सोहम शब्दाचा मारा केला | विठ्ठल काकुळती आला || ४ ||

जनी म्हणे बा विठ्ठला | जीवे न सोडी मी तुजला || ५ ||

धरीला पंढरीचा चोर गळा बां