Skip to main content
पडताळणी प्रलंबित

अबीर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग…..

अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग || धृ ||

उंबरठ्याशी कैसे शिवू आम्ही जाती हीन

रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्हीलीन, पायरीसी होवू दंग गावूनी अभंग || १ ||

वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू, चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हावू

विठ्ठलाचे नाव घेवूनि निसं:ग || २ ||

आषाढी कार्तिकी भक्त जन येती साधुजन येती

पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती, चोख म्हणे नाम घेता भक्त होती दंग || ३ ||

अबीर गुलाल उधळीत रंग नाथा