Skip to main content
पडताळणी प्रलंबित

आता कोठे धावे मन

आता कोठे धावे मन, तुझे चरण देखिले आज || धृ ||

भाग गेला शीण गेला, अवघा झाला आनंद || १ ||

प्रेम रसे बैसली मिठी, आवडी लाठी मुखाशी || २ ||

तुका म्हणे आम्हा जोगे, विठ्ठल घोंगे खरे माप || ३ ||

आता कोठे धावे मन aata kothe dhave man