Skip to main content
पडताळणी प्रलंबित

येग येग विठाबाई

येग येग विठाबाई, माझे पंढरीचे आई || धृ ||

भीमा आणि चंद्रभागा, तुझ्या चरणीच्या गंगा || १ ||

इतुक्यासाहित त्यां बा यावे, माझे रंगणी नाचावे || २ ||

माझा रंग तुझे गुणी, म्हणे नामयाची जनी || ३ ||

येग येग विठाबाई yeg yeg vithabai 2