Skip to main content
पडताळणी प्रलंबित

कानडा राजा पंढरीचा

कानडा  राजा पंढरीचा

वेदानाही नाही कळला अंत पार यांचा …. || धृ ||

निराकार तो निर्गुण ईश्वर

कसा प्रगटला असा विटेवर

उभय ठेविले हात कटीवर

पुतळा चैतन्याचा … || १ ||

परब्रह्म हे भक्तांसाठी

उभे थकले भिमेसाठी

उभा राहिला भाव सांवयव

जणू कि पुंडलिकाचा … || २ ||

हा नाम्याची खीर चाखतो

चोखोबाची गुरे राखतो

पुरंदराचा हा परमात्मा

वाली दामाजीचा … || ३ ||

कानडा राजा पंढरीचा kanada raaja pandharicha